MAHA TET 2025 — अभ्यासक्रम | Syllabus
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2025 साठी संपूर्ण सिलेबस मराठीत. Paper 1 व Paper 2 चा विषयवार अभ्यासक्रम, परीक्षेची रचना आणि तयारीसाठी महत्वाच्या टिप्स.
Maharashtra Teacher Eligibility Test - syllabus / महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - पाठ्यक्रम (अभ्यासक्रम)
पेपर (१) (इ. १ ली ते इ. ५ वी प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२ या परीक्षेतून खालील प्रमाणे
भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, तेलुगु, कन्नड, हिंदी, बंगाली |
---|---|
भाषा-२ | इंग्रजी, मराठी (मराठी किंवा इंग्रजी) |
इ. १ ली ते ५ वी असलेल्या अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील.
(३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र:
या विषयाच्या अभ्यासातील विचारांवरून येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन-अभ्यास प्रक्रियेसंबंधी असतील. यावर खोलवर विशेष लक्ष असणार आहे.
बालमानसशास्त्र व अध्यापन शिक्षण पद्धतींवर आधारित अभ्यासक्रमावर आधारित राज्यस्तरावर काही असलेले विद्यमान पाठ्यक्रम लागू राहतील.
४) गणित:
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संकल्पना, तर्कशास्त्र, समस्या निराकरण व गणित विषयाच्या अध्यापनशास्त्रावर आधारित असतील.
गणित विषयाचा पाठ्यक्रम इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित असेल.
५) पर्यावरण अध्ययन:
पर्यावरण अभ्यासाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयांच्या संकल्पना यांवर व या विषयाच्या अध्यापनशास्त्रावर आधारित असतील. परिसर अभ्यासाची व्याप्ती इ. १ ली ते इ. ५ वी च्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्संहित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम-२०१२ मध्ये इ. ३ री ते इ. ५ वी या स्तरांमध्ये पर्यावरण अभ्यास हा विषय नाही. पर्यावरण अभ्यास हा विषय प्रथम भाषा वा इतर विषयांमध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. इ. ३ री ते इ. ५ वी च्या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००५ मध्ये इतिहास, नागरीशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील.
कायमच पद्धती : – वरील सर्व विषयांच्या बाबत इ. १ ली ते इ. ५ वी च्या अभ्यासक्रमातील घटकांत, माध्यमिक शाळांत परीक्षेसाठी लागणारी पातळी लक्षात येईल.
संदर्भ :
-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
-
प्रचलित अध्यापन शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
-
संबंधित विषयांवरील राज्य शासनाने विहित केलेल्या प्रचलित इ. १ ली ते इ. ५ वी ची पाठ्यपुस्तके
पेपर (२) (इ. ६ वी ते इ. ८ वी – उच्च प्राथमिक स्तर)
१) भाषा-१ व २) भाषा-२ या परीक्षेतून खालील प्रमाणे
भाषा-१ व भाषा-२ विषय घेता येतील.
भाषा-१ | मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली / गुजराती / तेलुगु / सिंधी / कन्नड / हिंदी |
---|---|
भाषा-२ | इंग्रजी, मराठी (मराठी किंवा इंग्रजी) |
इ. ६ वी ते इ. ८ वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित भाषांचा पाठ्यक्रम लागू राहील.
३) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र :
या विषयाच्या अभ्यासातील विचारांवरून येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी ११ ते १४ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन-अभ्यास प्रक्रियेसंबंधी असतील. यावर खोलवर विशेष लक्ष असणार आहे.
त्यांचे गुणवैशिष्ट्ये, सामाजिक अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन प्रक्रियेशी संबंधित मूल्यमापन पद्धतींवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
या विषयाचा अभ्यास व अध्यापन शिक्षण पद्धतीचा अभ्यासक्रम ११ ते १४ वर्षे वयोगटासाठी प्रचलित इ. ६ वी ते इ. ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व राज्य स्तरावर लागू असलेला पाठ्यक्रम लागू राहील.
अ) गणित व विज्ञान विषय गट :-
गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण ६० गुण असून त्यापैकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय स्तरातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मुलभूत संबोध समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामाधील संबंधित विषयाचा इयत्ता ६ वी ते ८ वी चा पाठ्यक्रम लागू राहील.
ब) सामाजिक शास्त्रे विषय गट :-
सामाजिक शास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारीत संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील.
काठिण्य पातळी :- वरील सर्व विषयांच्या इयत्ता ६ वी ते ८ वी चे अभ्यासक्रमातील घटकावर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील.
संदर्भ :-
प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इ. ६ वी ते ८ वी व पाठ्यक्रम
प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित इ. ९ वी वी ते १२ वी ची पाठ्यपुस्तके
प्रचलित बी एड अभ्यासक्रम व पाठ्यक्रम
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
WhatsApp channel : click here
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
WhatsApp channel : click here
टिप्पण्या