मैं योगेश जाधव (उच्च माध्यमिक शिक्षक, लेखक, कवि) अपने वेबपेज DNYAN SAGAR में आपका स्वागत करता हूं|

About us

 स्व: परिचय :

             मी योगेश जाधव शिक्षक, लेखक, कवी. ब्लॉग राईटर, युट्युबर. मला शैक्षणिक, राजकीय, वैचारिक अशा विविध विषयांवर वाचायला, बोलायला, लिहायला, नेहमी आवडते. समाजाप्रती आपले कर्तव्य निभवायला ही आवडते. माझे शिक्षण बी. ए., डी.टी.एड., एम. ए., बी.एड. असे झाले असून जवळ जवळ दहा वर्षापासुन मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या या ब्लॉग वेबसाईट वर सर्व प्रकारची माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सर्व माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत व सरळ रित्या पोहोचावी यासाठी ही सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती संकलनकर्ता मी असलो तरी त्यात दिलेल्या माहितीचे श्रेय त्या त्या विचारवंताला, लेखकाला जाते. या ब्लॉगवर माझे वैयक्तिक लेखनही प्रसिध्द करण्यात आलेले आहे. जेथे मी माझ्या नावाचा उल्लेख केलेला आहे. सर्व नवीन माहिती आपल्यापर्यंत सतत मिळत राहील यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील. आपल्याकडेही काही माहिती असेल व ती आपण प्रसिध्द करू इच्छित असाल तर तुमची माहिती मला पाठवावी. ती माहिती तुमच्या नावासहित प्रसिध्द करण्यात येईल. 

              माझे स्वलिखित मराठी विषयाचे गाईड गुजरात राज्यात प्रसिध्द केलेले आहे. हे गाईड इयत्ता १२ वीच्या बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचे असून त्यातूनच मराठी विषयच बोर्डाचा पेपर येतो. माझ्या बऱ्याच कविता ही लिहून झाल्या आहेत. ज्यातून विविध सामाजिक विषय मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. युट्युब चेनेल वर देखील विविध शैक्षणिक व इतर माहिती देणारे व्हिडीओ देण्यात आलेले आहेत. विविध स्वरूपातील लिखाण करून समाजात एक सद्विचार प्रसारित करण्याचा माझा नेहमी मानस असतो. माणसाच्या जीवनात त्याला लागणाऱ्या गोष्टींचे ज्ञान त्याला असावे. म्हणून या साईटवर ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

            आपल्याला या ब्लॉग वेबसाईट वरचे अपडेट ज्ञान सर्वप्रथम पाहिजे असेल तर सबस्क्रिप्शन करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला जशीही माहिती अपडेट होईल तसा एक मेल येईल. आपले सहकार्य नेहमी मिळत राहील अशी आशा करतो. धन्यवाद !

                                                                                     - योगेश जाधव


टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा