PAVITRA PORTAL - Teacher recruitment 2025
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक/ शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणेसाठीच्या सूचना (TAIT-२०२५) (दि. १५/१२/२०२५)
अ) सर्वसाधारण माहिती व सूचना :
४. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील तसेच महाराट्र शासनाच्या इतर विभागांच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
५. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी २,०९,१०१ उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्व- प्रमाणपत्र (Self Certification) करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे.
६. उमेदवारांना त्यांचे स्व-प्रमाणपत्र (Self Certification) करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
७. पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदांच्या इयत्तांचा गट, विषय व आरक्षणनिहाय, व्यवस्थापननिहाय रिक्त पदांची माहिती दर्शविणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.
८. स्थानिक स्वराज्य संस्थाकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील.
९. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असतील.
१०. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ या चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक १४/०५/२०२५ असा होता, त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक अर्हता दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य आहे.
११. उमेदवाराची दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक २५/०९/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेऊन जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय याचा एकत्रित विचार करून उमेदवारास त्याच्या लॉगीनवर प्राधान्यक्रम देण्यासाठी रिक्त पदांची व्यवस्थापननिहाय यादी उपलब्ध होईल. सदर रिक्त पदांच्या यादीतून उमेदवाराने निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) निवड प्रक्रियेत गुणवत्तेनुसार विचारात घेतले जातील.
१२. जाहिरातीतील आरक्षण, इयत्तांचा गट व विषय, उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रम (Locked preferences) यांचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल.
१३. त्या त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्यांची स्व-प्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील.
ब) स्व- प्रमाणपत्राबाबत सूचना : अर्जात म्हणजेच स्व-प्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा पाठविलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदींमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैर वर्तणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य अशा शिक्षेस पात्र ठरेल.
१. उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे.
२. पवित्र पोर्टल वरील नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self Certification) भरण्याची प्रक्रिया उमेदवाराने स्वतः करणे आवश्यक आहे.
३. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवाराने नोंदणी (Registration) व स्व-प्रमाणपत्र (Self Certification) साठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये Capital Letters मध्ये भरावी.
४. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेसंदर्भात स्व-प्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी.
५. संबंधित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक १४/०५/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्हता व दिनांक २५/०९/२०२५ अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्हता विचारात घेतली जाईल.
६. ज्या उमेदवाराचा निकाल कोणत्याही कारणांमुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्हतेचा निकाल दिनांक १४/०५/२०२५ नंतर व व्यावसायिक अर्हतेचा निकाल दिनांक २५/०९/२०२५ नंतर जाहीर झाला असेल अशावेळी उमेदवाराने विहित मुदतीत अर्हता धारण केली, असे मानण्यात येणार नाही.
७. उमेदवाराने पत्रव्यवहाराचा स्वतःचा पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा.
८. उमेदवाराचे वय, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, आरक्षित प्रवर्ग (असल्यास) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांग व्यक्ती, महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू तसेच अनाथ इत्यादी संदर्भात न चुकता निःसंदिग्धपणे / निर्विवादपणे दावा करणे आवश्यक आहे. अर्जातील संबंधित रकान्यात स्पष्टपणे दावा केला नसल्यास सबंधित दाव्याचा विचार केला जाणार नाही. तसेच उमेदवार एकापेक्षा जास्त दावे करू इच्छित असल्यास तसे स्पष्टपणे स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद करावे.
९. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण (दिव्यांग व अनाथ प्रवर्गासह) इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत.
१०. आरक्षित प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, खुल्या प्रवर्गातील महिला वगळून) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer) प्राप्त असणे आवश्यक आहे.
११. प्रस्तुत पदभरतीकरिता सन २०२५-२६ या वित्तीय वर्षासाठी ग्राह्य असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer) उमेदवारांनी सादर करावे.
१२. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवाराकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
१३. उमेदवारांनी वेळोवेळी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांना निवडीसाठी तात्पुरते पात्र समजण्यात येईल, स्व-प्रमाणपत्रामध्ये पात्रतेविषयक माहिती मूळ कागदपत्र/प्रमाणपत्रांच्या आधारे संबंधित व्यवस्थापनाकडून तपासण्यात येईल व मूळ कागदपत्रांच्या आधारे पात्र आढळून आल्यानंतरच उमेदवाराची निवड निश्चित होईल. अन्यथा अपात्र उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व असा उमेदवार योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.
१४. नियमानुसार नियुक्तीसाठी पात्र असणारा उमेदवार अध्यापन करण्यास शारीरिक व मानसिकदृष्ट्या पात्र असल्याचे सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.
१५. सदरहू शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी राज्यातील कोणत्याही कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय व्यक्ती यांपैकी कोणाचीही अभिकर्ता / माध्यम म्हणून नियुक्ती केलेली नाही. नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून अर्जदारांनी सावध राहावे.
१६. उमेदवारांनी पवित्र प्रणाली व पदभरतीशी निगडित असलेल्या विविध शासन निर्णयांचे काळजीपूर्वक वाचन करून स्व-प्रमाणपत्रातील माहिती भरावी.
१७. पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्रामध्ये संपूर्ण माहिती नमूद केल्यानंतर निवडप्रक्रियेसंदर्भातील पुढील कोणतीही कार्यवाही केव्हा होणार याबाबत उमेदवाराने सतर्क राहणे आवश्यक आहे.
तुमच्या सूचनेनुसार, पीडीएफमधील पेज नंबर ७ वरील 'क) मागासवर्गीय आरक्षण' या मुद्यापासूनचा मजकूर कोणताही तांत्रिक कोड न वापरता, सामान्य मजकुराच्या स्वरूपात खालीलप्रमाणे आहे:
क) मागासवर्गीय आरक्षण
शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीकरिता आरक्षणाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:-
i. उभे आरक्षण / सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे आरक्षण
ii. आडवे आरक्षण / समांतर आरक्षण
१. कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या व त्याप्रमाणे अर्जात निरपवादपणे दावा करणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम २० नुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.
२. महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातील/देशातील उमेदवार तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील ८६५ गावातील उमेदवार केवळ 'अराखीव-सर्वसाधारण' पदांवरील नेमणुकीसाठी पात्र असतील.
३. अर्जामध्ये महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याचा व आरक्षित प्रवर्गाचा (लागू असल्यास) स्पष्टपणे दावा केल्याशिवाय व प्रस्तुत दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्रे / पुरावा अपलोड केल्याशिवाय संबंधित आरक्षित पदावरील नियुक्तीकरिता उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही.
४. अर्जामध्ये कोणत्याही प्रकारच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ आवश्यक सर्व वैध कागदपत्रे / पुरावा अपलोड करू न शकलेल्या उमेदवाराचा विचार केवळ 'अराखीव' सर्वसाधारण' पदांवरील निवडीकरिता होऊ शकेल.
५. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणासंदर्भातील राज्याच्या आर्थिक दुर्बल घटकातील ज्या व्यक्तीच्या जातींचा महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१ अन्वये विहित करण्यात आलेल्या मागासवर्गासाठी अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार घोषित मागासवर्गीयांमध्ये समावेश नसेल अशा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय आहे. याबाबतीत शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेले निकष लागू राहतील.
६. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठी सक्षम प्राधिकारी यांनी वितरित केलेले व राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशाकरिता राज्य शासनाच्या प्रमाणपत्राचा नमुना वापरणे आवश्यक आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, शिक्षण सेवक / शिक्षक सेवांसाठीच्या पदभरतीकरिता वापरता येणार नाही.
७. विविध सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठींच्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य लोकसेवा (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण) अधिनियम, २००१ व महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम-२०२४ आणि तदनंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांनुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील.
८. जातीच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम-२००० आणि महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन) नियम- २०१२ मधील तरतुदी आणि यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी आदेश काढून विहित केलेल्या नमुन्यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रदान करण्यात आलेले जात पडताळणी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
९. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी ते समाजातील उन्नत व प्रगत गटामध्ये मोडत नाहीत, असे स्व-प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे नमूद करणे व त्याबाबतच्या वैध प्रमाणपत्राच्या प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
१०. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ज्या व्यक्तींच्या नावे जातीचे प्रमाणपत्र असेल ती व्यक्ती व त्या व्यक्तीचे कुटुंब क्रिमी लेअरमध्ये मोडत नसल्याचे व धारकाच्या नावाने सर्वसाधारण रहिवास प्रमाणपत्रात प्रमाणित असणे आवश्यक आहे.
११. महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असलेल्या स्थलांतरित मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशान्वये निर्गमित करण्यात आलेल्या तरतुदी लागू राहतील.
ड) समांतर आरक्षण
समांतर आरक्षणांतर्गत समांतर आरक्षणाचा प्रकार महिला ३०%, माजी सैनिक १५%, अंशकालीन १०%, प्रकल्पग्रस्त ५%, भूकंपग्रस्त २%, खेळाडू ५ %, अनाथ १ % याप्रमाणे आरक्षण राहील
१. महिलांसाठीचे आरक्षण :
महिलांसाठी समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासनाकडून विशेष तरतुदी करण्यात आल्या असून महिलांना त्यांच्याशी संबंधित सामाजिक प्रवर्गाच्या तरतुदीव्यतिरिक्त सदरच्या तरतुदी या अतिरिक्त आहेत2. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटातील महिलांना, महिलांकरिताचे समांतर आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही3. थोडक्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अराखीव प्रवर्ग वगळता इतर सामाजिक प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र लागू राहील4. मागासवर्गीय व्यक्तीशी आंतरजातीय विवाह केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या स्वतःच्या मूळ प्रवर्गानुसार सवलती देय असतील5. महिलांसाठी आरक्षित पदांवर दावा करणाऱ्या संबंधित उमेदवाराने महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे6. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील महिला व अमागास महिलांना नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही7. विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील महिलांनी त्यांच्या संबंधित प्रवर्गाच्या आरक्षणाकरिता आवश्यक असलेले नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे8.
२. माजी सैनिकांसाठीचे आरक्षण :
माजी सैनिक उमेदवारांना शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरीता १५% समांतर आरक्षण लागू आहे9. माजी सैनिकांसाठी आरक्षित पदावर राज्य शासनाच्या सेवेमध्ये गट-क मध्ये एकदा नियुक्ती झाल्यानंतर, तो धारण करीत असलेल्या पदापेक्षा उच्च श्रेणी वा अन्य संवर्ग यातील नियुक्तीसाठी माजी सैनिक म्हणून आरक्षणाचा फायदा पुन्हा मिळणार नाही. याशिवाय शासनाच्या माजी सैनिक आरक्षण व नियुक्ती संदर्भातील सर्व तरतुदीही लागू राहतील.
३. पदवीधर अंशकालीन कर्मचारी :
सामान्य प्रशासन विभागाच्या विविध शासन निर्णयातील तरतुदींनुसार उमेदवारांसाठी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठीचे आरक्षण लागू आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरीता १०% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गांतर्गत कल्पीकृत आहे. सुशिक्षित बेरोजगारांना अर्थ साहाय्य या योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयामध्ये तीन वर्षांपर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर अंशकालीन उमेदवारांना आरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. शासन निर्णयानुसार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी उच्च वयोमर्यादा वयाच्या ५५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम राहील.
४. प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण :
प्रकल्पग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरिता ५% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गांतर्गत कल्पीकृत आहे. विविध शासन निर्णयातील तरतुदींनुसार प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आरक्षण लागू आहे.
५. भूकंपग्रस्तांचे आरक्षण :
भूकंपग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळसेवा भरतीच्या फक्त गट-क संवर्गातील पदांकरिता २% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गांतर्गत कल्पीकृत आहे. शासन निर्णयातील तरतुदींनुसार भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी आरक्षण लागू आहे. भूकंपग्रस्तांकरिता आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र उमेदवार न मिळाल्यास सदर पदावर प्रकल्पग्रस्त व्यक्तींची शासन मान्यतेने गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
६. प्राविण्यप्राप्त खेळाडूंचे आरक्षण :
खेळाडूंच्या आरक्षित पदांकरिता उमेदवार हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे गट-क संवर्गासाठीची आहेत काय आणि खेळाचा कालावधी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीचा आहे काय, याची खातरजमा करावी अशी प्रमाणपत्रे संबंधित विभागातील उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणित केलेली असावीत. प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी क्रीडा प्रमाणपत्राचा पडताळणी अहवाल अथवा अर्जाची पोचपावती सादर न केल्यास उमेदवार खेळाडू आरक्षणासाठी अपात्र ठरेल.
७. अनाथ व्यक्तींचे आरक्षण :
अनाथांच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. ज्या अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत, अशी बालके आरक्षणासाठी पात्र राहतील. ज्या मुलांच्या आई-वडिलांचे निधन त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी झाले असेल, अशाच अनाथ बालकांना आरक्षण अनुज्ञेय राहील.
८. दिव्यांग व्यक्तीसाठीचे आरक्षण :
दिव्यांग व्यक्तींकरिता एकूण पदांच्या ४% पदे खालीलप्रमाणे आरक्षित आहेत:
अ गट: अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त, स्नायू विकृती (१%).
ब गट: अंध किंवा अल्पदृष्टी (१%).
क गट: कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता (१%)
ड गट: स्वमग्नता, मंदबुद्धी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मानसिक आजार (१%).
इ गट: वरील 'अ' ते 'ड' मधील एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी दिव्यांग अधिकार अधिनियम, २०१६ नुसार लाभ मिळतील.
दिव्यांग आरक्षणासाठी किमान ४०% दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणे बंधनकारक असून, उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळावरून वितरित प्रमाणपत्र व UDID कार्ड सादर करणे आवश्यक आहे.
इ) महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांसाठी तरतुदी :
सीमा भागातील ८६५ गावातील मराठी भाषक उमेदवार सर्व अटींची पूर्तता करीत असल्यास नियुक्तीसाठी पात्र असतील39. जिथे किमान १५ वर्षे वास्तव्याची अट असेल, तिथे या गावातील वास्तव्य विचारात घेतले जाईल. तथापि, सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला सादर करणे अनिवार्य आहे. हे उमेदवार केवळ 'अराखीव-सर्वसाधारण' पदांवरील निवडीकरिता पात्र असतील.
फ) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र :
उमेदवारांच्या हयात अपत्यांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल आणि २८ मार्च २००६ नंतर तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला असेल, तर उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र ठरेल.
ग) संगणक ज्ञान :
शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरवलेली संगणक अर्हता विहित कालावधीत धारण करणे आवश्यक आहे.
ह) प्रमाणपत्र पडताळणीवेळी लागणारी कागदपत्ते :
स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करताना जी प्रमाणपत्रे अपलोड करण्यास सूचित केले आहे, ती मूळ प्रमाणपत्रे/कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यांची नियुक्तीसाठी केवळ तात्पुरती शिफारस केली जाईल. प्रत्यक्ष पडताळणीच्या वेळी खालील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील:
१) वयाचा पुरावा (मॅट्रिक्युलेशन/दहावीचे प्रमाणपत्र, वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला).
२) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेची सर्व गुणपत्रके व प्रमाणपत्रे).
३) ज्या शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत श्रेणी (जसे की CGPA/OGPA) देण्यात आली असेल, तेथे संबंधित विद्यापीठ किंवा संस्थेच्या नियमानुसार गुणांच्या टक्केवारीत रूपांतर केल्याचे प्रमाणपत्र किंवा त्याबाबतची अधिकृत माहिती.
४) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र (इयत्ता पहिली ते आठवीच्या गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता).
५) शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ (TAIT-2025) चे गुणपत्रक.
६) मागासवर्गीय असल्याचा पुरावा (सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र).
७) नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र: अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) आणि अराखीव (Open) महिला वगळता, इतर सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी चालू आर्थिक वर्षाचे वैध प्रमाणपत्र आवश्यक आहे.
८) समांतर आरक्षणाचा दावा केला असल्यास त्याचे प्रमाणपत्र: दिव्यांग, माजी सैनिक, महिला आरक्षण, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले मूळ प्रमाणपत्र किंवा दाखला.
९) विवाहित महिला उमेदवारांच्या नावात बदल झाला असल्यास, लग्नाचे प्रमाणपत्र किंवा अधिकृत सरकारी राजपत्र (गॅझेट).
१०) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (विहित नमुन्यातील स्व-घोषणापत्र).
११) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला (डोमिसाईल प्रमाणपत्र).
१२) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असल्यास त्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र.
१३) मुख्य अर्जाची (स्व-प्रमाणपत्राची) प्रत.
उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रात केलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ वरील सर्व कागदपत्रे प्रत्यक्ष पडताळणीच्या वेळी सादर न केल्यास, संबंधित उमेदवाराचा त्या आरक्षणासाठी किंवा पदासाठी विचार केला जाणार नाही.
ज) गैरप्रकार व गैरप्रकाराचे प्रयत्न:
शिक्षक भरती प्रक्रियेत खालील गोष्टी गैरप्रकार मानल्या जातील:
१. अर्जात खोटी माहिती देणे किंवा महत्त्वाची माहिती दडवून ठेवणे.
२. कागदपत्रांमध्ये अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा बनावट कागदपत्रे सादर करणे.
३. निवडीसाठी कोणत्याही प्रकारे राजकीय किंवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे.
४. परीक्षेच्या वेळी किंवा भरती प्रक्रियेत तोतयागिरी करणे.
५. भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.
ल) गैरप्रकार प्रकरणी होणारी कारवाई:
१. वरीलपैकी कोणताही गैरप्रकार आढळल्यास संबंधित उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
२. अशा उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि त्याला भविष्यातील सर्व भरती प्रक्रियेतून कायमस्वरूपी बाद केले जाईल.
३. जर उमेदवार आधीच सेवेत रुजू झाला असेल आणि नंतर गैरप्रकार सिद्ध झाला, तर त्याची सेवा त्वरित समाप्त केली जाईल.
४. सन २०१८ व २०१९ मधील टीईटी (TET) परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत न्यायालयाच्या आदेशानुसार कडक कारवाई केली जाईल.
५. ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी (TAIT) एकापेक्षा जास्त वेळा दिली आहे, अशा उमेदवारांना पडताळणीनंतर निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना:
१. भरती प्रक्रियेच्या सर्व अपडेट्स आणि सूचना 'पवित्र' पोर्टलवर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील. उमेदवारांनी या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी.
२. भरती प्रक्रियेत काही बदल झाल्यास किंवा न्यायालयाचे नवीन आदेश आल्यास, त्यानुसार सुधारित सूचना पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या जातील.
३. उमेदवारांनी आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलू नये, कारण सर्व अधिकृत संवाद त्याद्वारेच केला जाईल.
संदर्भ : पवित्र पोर्टल वर प्रसिद्ध पत्रके पाहावेत.
उमेडवारांसाठी सूचना
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.
१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ ही दिनांक २७/०५/२०२५ ते दिनांक ३०/५/२०२५ आणि ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,२८,८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती.
२. सदर चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.
३. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
४. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षा केवळ एक वेळ देण्याची तरतूद आहे. उमेदवारांना चाचणी परीक्षेचे प्रवेशपत्र वितरित करताना चाचणीसाठी एकापेक्षा अनेक प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास केवळ एकाच प्रवेश पत्राद्वारे चाचणीस प्रविष्ट होण्याबाबत सूचित करण्यात आले होते. असे एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर सहभागी करून घेता येणार नाही. त्यामुळे अशा उमेदवारांनी निवडप्रक्रियेत सहभागी होऊ नये, सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
५. उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक १५/१२/२०२५ ते दिनांक २९/१२/२०२५ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
६. TET/CTET मध्ये तफावत येत असलेल्या उमेदवारांना त्यांचे लॉगीनवर 'Request for Change in Data' या मेनूअंतर्गत सुविधा देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी सदर तफावत दूर करण्यासाठी आपली TET/CTET मधील माहिती नोंद करून ती Approve करण्यासाठी आपल्या सोयीच्या निवडलेल्या जिल्ह्याकडे Request पाठवावी. ज्या उमेदवारांच्या TET/CTET च्या माहितीमध्ये तफावत येईल अशा उमेदवारांना राज्यातील त्यांनी निवड केलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांना सदर उमेदवार आपणच असल्याचे सिद्ध करण्यासाठी विनंती अर्ज, TET/CTET गुणपत्रिका व प्रमाणपत्राची प्रत, TAIT आवेदनपत्र/प्रवेशपत्र/गुणपत्रिका तसेच ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे घेऊन संपर्क साधावा.
७. जेथे पदवीकरिता CGPA / OGPA or Letter grade देण्यात येते, तेथे संबंधित विद्यापीठ / संस्थेच्या निकषानुसार शेकडा गुण नमूद करावेत. इयत्ता १० वी, इयत्ता १२ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA / OGPA or Letter grade इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणींचे प्रत्यक्ष गुणांमध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड / विद्यापीठ / संस्थेचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर अशी वेगवेगळी सूत्रे देणे शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांचे शैक्षणिक / व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA / OGPA or Letter grade इत्यादी श्रेणी नमूद आहेत, त्यांनी त्या त्या बोर्ड / विद्यापीठ / संस्थांचे असलेले गुणरूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण या माहितीची नोंद करावी.
८. काही उमेदवारांकडे इयत्ता १० / १२ वी अर्हता नसल्याने पोर्टलवर सदर नोंद करता येत नाही. अशा उमेदवाराकडे त्या समकक्ष असलेली अर्हता धारण करीत असल्यास त्या अर्हता त्या त्या प्रकारासाठी नोंद करावी. उदा. इ १० वी साठी विद्यापीठाची पूर्वतयारी अभ्यासक्रम, इ १२ वी साठी पॉलिटेक्निक डिप्लोमा (पदविका) असलेली अर्हता इत्यादी सारखी माहिती नोंद करावी व त्यासाठी समकक्षते बाबतचे पुरावे सोबत जोडावे. यासाठी स्वतंत्र सुविधा दिली जाणार नाही.
९. शैक्षणिक अर्हते अंतर्गत पदवी परीक्षेचे फक्त मुख्य / प्रधान विषय आपण नमूद करावयाचे आहेत. पदवी परीक्षेच्या गौण विषयांचा समावेश स्व-प्रमाणपत्रामध्ये करता येणार नाही, गौण (Subsidiary) विषयांचा समावेश उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये केल्यास, संबंधित उमेदवार कोणत्याही स्तरावर अपात्र ठरेल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
१०. माजी सैनिक प्रवर्गामध्ये स्वतः निवृत्त सैनिकांचा समावेश होतो. यामध्ये माजी सैनिकांची पाल्ये किंवा त्यांच्या पत्नीचा समावेश होणार नाही. तथापि, शहीद सैनिकांच्या विधवा पत्नीचा / मुलाचा अथवा अविवाहित मुलीचा समावेश माजी सैनिक प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये नोकरीसाठी होईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
११. B.A.Ed. / B.Sc.Ed. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी या बाबतची नोंद स्व-प्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली करावी. सदर अभ्यासक्रमाचा व्यावसायिक अर्हतेमध्ये विचार केला जाईल. त्यामुळे या अर्हतेची नोंद स्वतंत्ररित्या व्यावसायिक अर्हतेमध्ये करण्याची आवश्यकता नाही.
१२. स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra25@gmail.com या ईमेल वर संपर्क साधता येईल.
शिक्षक पदभरती (TAIT-२०२५) स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया:
सुरुवात: नोंदणी (Register)
तुमचा TAIT-२०२५ चा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर वापरून नोंदणी करा.
पासवर्ड तयार करा (Create Password)
भविष्यातील लॉगिनसाठी स्वतःचा सुरक्षित पासवर्ड सेट करा.
लॉगिन (Login)
तुमचा युजर आयडी (२५_रोल नंबर) आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर प्रवेश करा.
वैयक्तिक व पत्त्याचा तपशील (Personal & Address Details)
स्वतःचे नाव, पालकांचे नाव आणि सध्याचा पत्रव्यवहाराचा पत्ता अचूक भरा.
प्रवर्ग आणि आरक्षण (Category & Reservation)
जातीचा प्रवर्ग आणि समांतर आरक्षण (महिला, खेळाडू, दिव्यांग इ.) निवडा.
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (Academic & Professional Qualification)
१० वी, १२ वी, पदवी आणि डी.एल.एड./बी.एड. च्या गुणांची नोंद करा.
टीईटी पात्रता (MAHATET/CTET Details)
शिक्षक पात्रता परीक्षेच्या (TET/CTET) गुणांची आणि प्रमाणपत्राची माहिती भरा.
स्व-प्रमाणित करा (Self Certify)
सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज 'Self Certify' करा.
प्रत डाउनलोड करा (Download Copy)
पुढील प्रक्रियेसाठी स्व-प्रमाणपत्राची प्रत जतन करून ठेवा.
PAVITRA PORTAL - Teacher recruitment 2025 login : click here
Home page : click here
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here
Follow on twitter : click here
टिप्पण्या