मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो.|

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती (टेट २०२२ दुसरा टप्पा) मेरीट लिस्ट

पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती (टेट २०२२ दुसरा टप्पा)

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक/शिक्षक पदभरतीसाठी "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.
  • सदर ऑनलाईन चाचणी दिनांक २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले.
  • "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयता १ ली ते १२ वी व अध्यापक विद्यालयातील शिक्षण सेवक/शिक्षक या रिक्त पदांच्या भरतीचा प्रथम टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. सदर टप्यांतर्गत दिनांक २५/०२/२०२४, दिनांक २५/०६/२०२४, दिनांक ३०/०७/२०२४ व दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या प्रकारात यापूर्वी प्रथम टप्प्यात २१,६७८ जाहिरातींच्या पदभरतीबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
  • शासन पत्र दि. १०/०९/२०२४ नुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ - दुसऱ्या टप्प्यांतर्गत आता शिक्षक निवडीची कार्यवाही करण्यात येत आहे.
  • आता दुसऱ्या टप्प्यात पवित्र पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांकडून शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यात १८ जिल्हा परिषदांच्या ४६८, १३ मनपाच्या-३६२, ५७ नगर पालिका/परिषदाच्या-२२१ व २५ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या ५३७ अशा एकूण १५८८ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
  • तसेच मुलाखतीसह निवडीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांमध्ये ८,७३३ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
  • पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा व शिफारस झालेल्या पदांचा तपशील पुढील प्रमाणे :
  • १) आरक्षणनिहाय रिक्त पदे अनुसूचित जाती-१८२, अनुसूचित जमाती-१३१, विमुक्त जाती (अ)-४६, भटक्या जमाती (ब)-२७, भटक्या जमाती (क)-४५, भटक्या जमाती (ड)-३१, विशेष मागास प्रवर्ग-२२, इतर मागास प्रवर्ग-२१७, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -१३७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-१८९, खुला-५५९ याप्रमाणे एकूण १५८६ पदे आहेत.
  • २) आरक्षणनिहाय शिफारस झालेले उमेदवार अनुसूचित जाती-१३५, अनुसूचित जमाती-६४, विमुक्त जाती (अ)-३७, भटक्या जमाती (ब)-२६, भटक्या जमाती (क)-२२, भटक्या जमाती (ड)-१४, विशेष मागास प्रवर्ग-०६, इतर मागास प्रवर्ग-१६८, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक १०७, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग-१३३, खुला-४०२ याप्रमाणे एकूण १११४ आहेत.
  • ३) गट निहाय रिक्त पदे: इ. १ ते ५ वी ८९२, इ. ६ ते ८ वी-३२२, इ. ९ ते १० वी-२२०, इ. ११ ते १२ वी-१५४ याप्रमाणे १५८८ आहेत.
  • ४) गटनिहाय शिफारस झालेले उमेदवार: इ. १ ते ५ वी ५५४, इ. ६ ते ८ वी-२१०, इ.९ ते १० वी-२१६, इ. ११ ते १२ वी १३४ याप्रमाणे १११४ आहेत.
  • ५) माध्यमनिहाय रिक्त पदे मराठी-१२५१, उर्दू-२५८, हिन्दी-५३, तामिळ २, बंगाली-२३. तेलुगू-१ याप्रमाणे एकूण १५८८ आहेत.
  • ६) माध्यमनिहाय शिफारस झालेले उमेदवार मराठी-९६३, उर्दू-१००, हिन्दी-३५, बंगाली-१६ याप्रमाणे एकूण १११४ आहेत.
  • उमेदवारांना दिनांक ११/०३/२०२५ ते २१/०३/२०२५ व दिनांक १०/०४/२०२५ ते १४/०४/२०२५ या कालावधीमध्ये स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे / दुरुस्त करणे याबाबतची सुविधा देण्यात आली होती.
  • उमेदवारांना दिनांक २५/०४/२०२५ ते २/०५/२०२५ व दिनांक ०६/०५/२०२५ ते ०८/०५/२०२५ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देण्यात आली होती.
  • दिनांक २१/०५/२०२५ रोजी स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या पदभरतीची सर्वसाधारण गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यानंतर मुलाखतीसह उमेदवार निवडीचा पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शिक्षकांच्या मुलाखतीसाठीची कार्यवाही प्रसिद्ध करण्यात येईल.
  • पदभरतीबाबत उमेदवारांना याद्वारे आवाहन करण्यात येते की पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित आपले म्हणणे/मागणी इत्यादी बाबी edupavitra२०२२@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात, जेणेकरून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.

Merit list TAIT Phase 2 PDF

   Without Interview Phase2_Regular Round_MNP 

    Without Interview Phase2_Regular Round_Private_Management 

    Without Interview Phase2_Regular Round_ZP 

 Home page  : click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 


Whatsapp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

संपर्क फॉर्म

पाठवा