SNA-SPARSH कार्यालय आदेश जनरेटर
SNA-SPARSH आदेश जनरेटर | आदेश तयार करा, PDF डाउनलोड करा आणि प्रिंट काढा
शाळेतील SNA-SPARSH संबंधित खर्चासाठी आदेशाचा मसुदा तयार करणे आता सोपे! या जनरेटरद्वारे आवश्यक माहिती भरून आदेश तयार करता येतो आणि तो A4 आकारात PDF म्हणून सेव्ह करून प्रिंट काढता येतो.
जनरेटर वापरण्याच्या सोप्या पायऱ्या
Step 1 – SNA-SPARSH कार्यालय आदेश जनरेट करा - बटनावर क्लिक करा.
Step 2 – आदेशाचा प्रकार निवडा
जनरेटरमध्ये उपलब्ध आदेश प्रकारांपैकी योग्य प्रकार निवडा.
- मोफत गणवेश योजना
- संयुक्त शाळा अनुदान
- समूह साधन केंद्र अनुदान, सभा व प्रवास
- वाहतूक भत्ता अनुदान
- किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड
- एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे
Step 3 – आवश्यक माहिती भरा
जिल्हा, तालुका, शाळेचे नाव, आदेश दिनांक, वेंडर माहिती, ठराव क्रमांक, बिलाची रक्कम आणि आवश्यक बँक तपशील अचूक भरा.
Step 4 – रकमेचे विभाजन तपासा
या जनरेटरमध्ये रकमेचे विभाजन पुढील निश्चित प्रमाणात आपोआप केले जाते: तुम्ही फक्त विद्यार्थी संख्या व प्रत्येक विद्यार्थी नुसार खर्च टाका . TDS असल्यास फक्त टक्के टाका ते आपोआप मोजले जातील व वाजवट येईल .
| घटक | टक्केवारी |
|---|---|
| पहिला घटक | 75% |
| दुसरा घटक | 12% |
| तिसरा घटक | 13% |
| एकूण | 100% |
उदाहरण: ₹10,000 रकमेचे विभाजन ₹7,500, ₹1,200 आणि ₹1,300 असे होईल.
Step 5 – TDS आणि निव्वळ देय रक्कम तपासा
TDS म्हणजे स्रोतावर कापला जाणारा आयकर. TAN हा कराचा दर नसून करकपात करणाऱ्या संस्थेचा ओळख क्रमांक आहे. त्यामुळे सर्व बिलांवर TAN मुळे एकच टक्केवारी लागू होत नाही.
कंत्राटी कामासाठी जुन्या आयकर कायद्यात सर्वसाधारण दर:
कंत्राटदार व्यक्ती किंवा HUF असल्यास 1%
कंत्राटदार इतर प्रकारची संस्था असल्यास 2%
व्यावसायिक सेवांसाठी सर्वसाधारण दर 10%, तर निर्दिष्ट तांत्रिक सेवांसाठी 2% आहे. हे दर लागू कायदेशीर अटी, आर्थिक मर्यादा आणि व्यवहाराच्या स्वरूपाच्या अधीन आहेत. प्रत्येक साहित्य खरेदी किंवा सेवा बिलाला कंत्राटी कामाचा दर लागू होत नाही.
१ एप्रिल २०२६ पासूनच्या देयकांसाठी Income-tax Act, 2025 मधील कलम 393 मधील संबंधित नोंद वापरावी. TDS दर व मर्यादा तपासण्यासाठी आयकर विभागाचा अधिकृत संदर्भ पहा:
https://www.incometax.gov.in/iec/foportal/help/all-topics/e-filing-services/tds-compliance
निव्वळ देय रक्कम मोजताना एकूण देय रकमेतून लागू TDS आणि इतर वैध कपाती वजा कराव्यात.
Step 6 – PDF तयार करा
सर्व माहिती पुन्हा तपासा.
आदेश तयार करा.
Print पर्याय निवडा.
प्रिंटरच्या यादीत Save as PDF निवडा.
A4 आकार निवडून PDF सेव्ह करा किंवा प्रिंट काढा.
अधिकृत संदर्भ
सूचना: हा जनरेटर आदेशाचा मसुदा तयार करण्यासाठी आहे. अंतिम आदेश वापरण्यापूर्वी बिलाची माहिती, TDS ची लागू तरतूद, कपाती आणि निव्वळ रक्कम तपासा. जनरेटरमधून तयार झालेला मसुदा हा स्वतःहून शासनमान्य किंवा मंजूर आदेश ठरत नाही.
SNA SPARSH , चेकर , मेकर व त्यांची संपूर्ण कामे व जबादारी समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा .
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
Whatsapp channel : click here

टिप्पण्या