मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो. | तुम्हाला आमच्या वेबपेज वर तूमची पोस्ट / बातमी अथवा जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास आम्हाला संपर्क करा.

SQAAF Self-evaluation 2025-26 | SQAAF स्वयं-मूल्यांकन २०२५-२६

मुख्याध्यापकांसाठी महत्त्वाची अपडेट: SQAAF स्वयं-मूल्यांकन २०२५-२६ प्रक्रिया सुरू!

महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा' (SQAAF) अंतर्गत स्वयं-मूल्यांकन करण्याची प्रक्रिया आता सुरू झाली  आहे . राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्यामार्फत या संदर्भातील सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.




१. स्वयं-मूल्यांकनाची मुदत

शाळांना आपले स्वयं-मूल्यांकन ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यासाठी खालील मुदत देण्यात आली आहे:

  • सुरुवात: १६ मार्च २०२६

  • अंतिम तारीख: १५ एप्रिल २०२६ (सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत)

२. माहिती भरण्यासाठी 'SQAAF-Maharashtra' ॲप

स्वयं-मूल्यांकनाची माहिती भरण्यासाठी मुख्याध्यापकांनी 'SQAAF - Maharashtra' हे ॲप Google Play Store वरून किंवा www.maa.ac.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करणे आवश्यक आहे

App Link : Click Here

लॉगिन करण्याची प्रक्रिया:

  1. शाळेचा UDISE नंबर टाका.

  2. UDISE+ मध्ये नोंदवलेला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा.

  3. तुमच्या ईमेलवर प्राप्त झालेला Password वापरून लॉगिन करा.

३. माहिती भरण्यापूर्वीची पूर्वतयारी

माहिती भरण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी खालील बाबींची खात्री करावी:

  • SCERT च्या वेबसाईटवरील सुधारित मार्गदर्शक पुस्तिका आणि मार्गदर्शक व्हिडिओ पहावेत.

  • शाळेतील शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीशी (SMC/SMDC) चर्चा करावी.

  • एकूण १२८ मानकांसाठी (Standards) आवश्यक असलेले पुरावे किंवा दस्तऐवज तयार ठेवावेत.

  • हे पुरावे PDF स्वरूपात शाळेच्या गुगल ड्राईव्हवर जतन करून त्यांच्या लिंक्स तयार ठेवाव्यात.

४. श्रेणी निश्चिती कशी होणार?

शाळेला प्राप्त झालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार खालीलप्रमाणे श्रेणी दिली जाईल:

प्राप्त गुण (टक्केवारी)श्रेणी                               
९१ ते १००%

अ+

८१ ते ९०%

७१ ते ८०%

ब+

६१ ते ७०%

५१ ते ६०%

क+

५०% पेक्षा कमी

५. तांत्रिक अडचणी आल्यास काय करावे?

जर मुख्याध्यापकांना लॉगिनसाठी Password प्राप्त झाला नसेल, तर त्यांनी तातडीने आपल्या केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा. मुख्याध्यापक बदलले असल्यास, नवीन मुख्याध्यापकांची माहिती विहित नमुन्यात (इंग्रजीमध्ये) केंद्रप्रमुखांमार्फत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे.

महत्त्वाची टीप:

एकदा माहिती 'Final Submit' केल्यानंतर गुगल ड्राईव्हवरील कोणत्याही फाईल्स डिलीट करू नयेत किंवा बदलू नयेत, कारण बाह्य मूल्यमापनाच्या वेळी या लिंक्स उपलब्ध असणे अनिवार्य आहे.


अधिक माहितीसाठी संपर्क:

  • ईमेल: sqaafmh@maa.ac.in

  • वेबसाइट: www.maa.ac.in

SQAAF बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना

SQAAF- स्वयं मूल्यांकन माहिती भरण्यापूर्वी करावयाच्या बाबीः

अ) माहिती भरण्यापूर्वी आपणाला देण्यात आलेल्या SQAAF सुधारित मार्गदर्शक पुस्तिकेचा अभ्यास करावा. ही मार्गदर्शक पुस्तिका आपणाला SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF टॅबमधील SQAAF - सुधारित मार्गदर्शक पुस्तिका या सब-टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आ) SQAAF बाबत SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवर SQAAF या टॅबमधील SQAAF-व्हिडिओ या सब-टॅबवर उपलब्ध असणारे सर्व व्हिडिओ पाहावेत.

इ) वेबसाईटवर देण्यात आलेल्या शासन निर्णयांचे वाचन करावे.

ई) वेबसाईटवर देण्यात आलेल्या SQAAF या टॅबमधील अनू. क्र.३ SQAAF-DASHBOARD, अनू. क्र.४ SQAAF-कृती आराखडा (ACTION PLAN), अनु. क्र.५ SQAAF अ+ श्रेणी मिळविलेल्या शाळांचे मानक निहाय पुरावे, अनू, क्र.६ SQAAF- सहायक (SQAAF CHATBOT) आणि अनू. क्र.७ SQAAF मानकनिहाय, क्षेत्रनिहाय, स्तरनिहाय पुराव्यांची यादी या टॅब मध्ये देण्यात आलेल्या माहितीचे अवलोकन करावे,

उ) आपल्या शाळेतील सर्व घटकांशी म्हणजेच शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, विद्यार्थी यांच्याशी SOAAF मुल्यांकनाबाबत चर्चा करावी.

ऊ) पुस्तिकेत दिलेल्या मानकनिहाय पुराव्यांची / दस्तऐवजांची / कागदपत्रांची शाळेत उपलब्धता

असल्याची खात्री करावी.

ऋ प्रत्येक गानकासाठी निर्धारित केलेले पुरावे हे वर्णन विधानाचे समाधान करणारे प्रत्यक्षदर्शी, वस्तुनिष्ठ असावेत. लु) असे पुरावे शाळेच्याच ईमेल आयडीशी संलग्न असणाऱ्या गुगल ड्राईव्हला जतन करून ठेवावेत.

गुगल ड्राईव्हला सेव्ह करताना मानक क्रमांक नमूद करून फाईल सेव्ह करावी.

* SQAAF- स्वयं मूल्यांकन माहिती भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबीः

"SQAAF -Maharashtra अॅप वापराबाबत महत्त्वाच्या सूचना :

१) मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये, www.maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF tab मधील → अ.क्र. ८ मध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून "SQAAF - Maharashtra" हे अॅप डाउनलोड करून घ्यावे. अथवा Google Play Store वरून SQAAF - Maharashtra" हे अॅप डाउनलोड करावे

२) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यावर सर्वात प्रथम Login Window दिसेल.

३) मोबाईलमध्ये अॅप ओपन केल्यानंतर Login साठी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा Udise नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल.

४) नवीन विडोवर शाळेचा Udise मध्ये नोंदविलेला इमेल आयडी नमूद्र कराया व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विडो ओपन होईल.

५) नवीन विडोवर मुख्याध्यापक यांचा Udise मध्ये नोंदविलेला गोबाईल नंबर / फोन नंबर दहा अकी नमूद करावा व पुढे जा या बटनावर क्लिक करावें, पुढील विंडो ओपन होईल

६) नवीन विंडोवर SQAAF साठी प्राप्त झालेला password नमूद करावा, (Udise + मध्ये नोंदविलेल्या इमेल आयडी वर हा password आपणाला प्राप्त झाला आहे. आपण (Udise+ मध्ये नोंदविलेल्या इमेल वरील INBOX / SPAM BOX मध्ये इमेल प्राप्त झाला आहे का याची खात्री करावी. Password प्राप्त न झाल्यास खालील सूचनेनुसार कार्यवाही करावी.) व पुढे जा या बटनावर क्लिक करावे, पुढील विंडो ओपन होईल.

७) येथे आपणाला शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापक यांचा Udise + मध्ये नोदविलेला मोबाईल नंबर, शाळेचा Udise + मध्ये नोंदविलेला इमेल आयडी, SQAAF साठी प्राप्त झालेला password दिसेल त्याखाली लॉगीन बटन दिसेल त्या बटनाला क्लिक केल्यानंतर पुढील विंडो ओपन होईल.

८) येथे आपणाला ३ टॅब दिसतील. पहिल्या टॅब मध्ये शाळेच्या संबंधित सर्व माहिती दिसेल. (शाळेचे नाव, शाळेचा udise नंबर, मुख्याध्यापकांचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा.) आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.

९) त्या खाली "स्वयं मूल्यांकन सुरु करा" हा दुसरा टॅब दिसेल त्या वर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल.

१०) येथे सुरवातीस सारांश दिसेल. (एकूण मानकांची संख्या १२८, प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या-०, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या १२८, प्राप्त गुण / एकूण गुण०/५१२)

११) त्याखाली १ ते १२८ मानके क्रमाने दिसतील. ज्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. त्या मानक क्रमांकावर क्लिक करावे पुढील विंडो ओपन होईल.

१२) त्या विडो मध्ये सुरवातीला मानक क्रमांक, त्याखाली मानक विधान व त्यानंतर त्या मानकाशी संबंधित वर्णन विधाने दिसतील. आपल्या शाळेसाठी लागू होणारे वर्णन विधान निवडून त्या वर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर त्या वर्णन विधानाचे पुरावे नोंद करण्यासाठी PASTE PROOF हा टेंब ओपन होईल. येथे आपण या मानकासाठी तयार केलेली GOOGLE DRIVE ची लिक PASTE करावी. GOOGLE DRIVE ची लिंक PASTE केल्यानंतर SUBMIT हा टेंब ओपन होईल. त्यावर क्लिक करावे. आपला त्या मानकासंबंधी प्रतिसाद नोंदविला जाईल, अशा प्रकारे १ ते १२८ मानकासाठी प्रतिसाद नोंदवावयाचा आहे. सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविणे बंधन कारक आहे.

१३) सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविल्यानंतर 'स्वयं मुल्याकन अंतिम करा" हा तिसरा टॅब ओपन होईल. जो पर्यंत सर्व मानकांचा प्रतिसाद नोंदविला जाणार नाही तो पर्यंत स्वयं मूल्यांकन अंतिम करा हा टॅब ओपन होणार नाही.

१४) "स्वयं मूल्यांकन अंतिम करा" या टॅब वर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांसाठीचे हमीपत्र दिसेल. या हमिपत्राचे वाचन करावे व त्या खाली दिलेल्या चेक बॉक्स वर क्लिक करावे. चेक बॉक्स वर क्लिक केल्यानंतर "स्वयं मूल्यांकन अंतिम करा हे बटन ओपन होईल त्यावर क्लिक करावे आपल्या शाळेचे स्वयं मूल्यांकन पूर्ण होईल.

१५) पुढील पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन असा संदेश सर्वात वर दिसेल. त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल.

१६) आपण फायनल सबमिशन केल्यानंतरचा प्रतिसाद डाउनलोड या टेंबचर क्लिक करून घ्यावा. डाउनलोड केलेल्या प्रतिसादाची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.

१७) याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद यामध्ये आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदविलेल्या मानकांची संख्या, प्रतिसाद न नोंदविलेल्या मानकांची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या इत्यादी माहिती दिसेल.

१८) याच पेजवर स्वयं मूल्यांकन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावे व त्याची प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावी.

१९) आपला प्रतिसाद पूर्ण नोंदविल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शविल्यानुसार आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली याची खात्री करून घ्यावी.

२०) स्वयं-मुल्यांकन/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मुल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल.


मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत करावयाची कार्यवाही:

मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत केंद्रप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाहीः

> मुख्याध्यापकांनी PASSWORD न मिळाल्याबाबत सर्वात प्रथम केंद्रप्रमुखांशी संपर्क साधावा.

> या app मध्ये लॉगीन करण्यासाठी सन २०२५-२६ मधील UDISE मध्ये नोंदविलेला शाळेवा इ-मेल आयडी, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर व इमेल आयडी वर आलेला password वापरण्यात आला आहे. ही सर्व माहिती असल्याशिवाय SQAAF app मध्ये आपली माहिती नोंदविता येणार नाही. म्हणजेच शाळेला स्वयं मूल्यांकन करता येणार नाही.

> उदा. शाळेचे मुख्याध्यापक बदलीने अथवा अन्य कारणाने बदलले असतील तर सध्याचे कार्यरत मुख्याध्यापक यांनी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याशी संपर्क साधून लेखी अर्जासह खालील नमुन्यात माहिती सादर करावी जेणेकरून SQAAF app मध्ये आवश्यक बदल करणे शक्य होईल. (सदरील माहिती इंग्रजीमध्येच सादर करावी अन्यथा बदल केला जाणार नाही.

गुगल ड्राईव्हची लिंक बनविणेबाबतची कार्यवाही-

१. आपल्या शाळेस लागू होणाऱ्या वर्णन विधानाची सर्वप्रथम माहिती घ्यावी.

२. माहिती घेतल्यानंतर आपल्या शाळेस लागू असणारा स्तर लक्षात घ्यावा.

३. स्तर लक्षात आल्यानंतर त्याची वस्तुस्थिती दर्शविणारी माहितीची पीडीएफ तयार करा. (उदा. फोटो/अहवाल/व्हिडीओ स्वरुपात असेल तर)

४. प्रत्येक मानकासाठी निश्चित करण्यात आलेल्या व शाळेची वस्तुस्थिती दर्शविणारे कागदपत्र/ दस्तऐवज याची एकच स्वतंत्र पीडीएफ फाईल किंवा फोल्डर तयार करण्यात यावा व त्यास मानक क्रमांकाचे नाव देण्यात यावे.

उदा. मानक क्र. ५१- मुख्याध्यापक कक्ष

५. पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ आपल्या शाळेच्या ई-मेलशी संबंधित गुगल ड्राईव्हवर अपलोड करावी व आवश्यकतेनुसार लिंक तयार करावी. आपल्या ई-मेल आयडीच्या ड्राईव्हवर संपादित करण्याची क्षमता (Capacity) तपासून घ्यावी.

६. गुगल ड्राईव्ह मधून त्या मानकासाठी तयार करण्यात आलेल्या पीडीएफ फाईलची लिंक कॉपी करून घ्यावी. गुगल ड्राईव्हवर अपलोड केलेली पीडीएफ फाईलची

लिक कॉपी करताना त्याच मानकासाठी बनवलेली लिक कॉपी केली आहे का? याची खात्री करावी.


गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया :

> गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करण्याची प्रक्रिया :

  • गुगल ड्राईव्ह उघडा शाळेचाच ईमेल आयडी वापरून लॉगिन करा आणि गुगल
  • ड्राईव्ह (Google Drive) उघडा.
  • फाईल किंवा फोल्डर निवडा: ज्या फाईल किंवा फोल्डरची लिंक तयार करायची
  • आहे, ती निवडा.
  • शेअर पर्याय निवडाः निवडलेल्या फाईलवर किंवा फोल्डरवर राईट क्लिक करा किंवा वरच्या मेनू बारमध्ये "शेअर" (Share) बटनावर क्लिक करा.
  • लिंक सेटिंग्ज बदलणेः एक पॉप-अप विंडो उघडेल. येथे "Get link" किंवा "लिक मिळवा" या पर्यायावर क्लिक करा. तुमच्याकडे काही पर्याय असतीलः
  • Restricted (मर्यादित): फक्त तुम्ही ज्या व्यक्तींना परवानगी दिली आहे त्यांनाच लिंक बघता येईल.
  • Anyone with the link (लिंक असलेल्या कोणालाही): ही सेटिंग निवडल्यास. ज्या कोणाकडे लिंक असेल त्याला ती फाईल बघता येईल.
  • लिंक कॉपी करा: Copy link" किवा 'लिंक कॉपी करा" या बटनावर क्लिक करा.

> लिंक पेस्ट करण्याची प्रक्रियाः

१. जिथे लिंक पेस्ट करायची आहे ती जागा निवडाः मानकाखाली दिलेल्या टॅबमध्ये तुमच्या फाईलची कॉपी केलेली लिंक पेस्ट करा.

२. लिंक पेस्ट कराः कर्सर ठेवून राईट क्लिक करा आणि "Paste" (पेस्ट) पर्याय निवडा किंवा कीबोर्डवरील "Ctrl + V" (विंडोज) किंवा " Cmd + V" (मॅक) हे शॉर्टकट वापरून लिंक पेस्ट करा.

३. प्रत्येक मानंकाचे वस्तुस्थितीदर्शक पुरावे दर्शविणारे मानकनिहाय पुरावे हे त्या त्या फोल्डर मध्ये असावेत.

४. पेस्ट लिंक केल्यानंतर त्याखाली असणारा "सबमिट करा" हा टेंब ओपन होईल त्यावर क्लिक करावे. अशाप्रकारे आपल्या शाळेसाठी लागू असणाऱ्या सर्व मानकांची निश्चित्ती करून माहिती पूर्ण करावी.

५. एखाद्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवून सबमिट केल्यानंतर आपणाला नोंदविण्यात आलेल्या प्रतिसादात बदल करावयाचा असल्यास अथवा

गुगल ड्राईव्हची लिंक बदलावयाची असल्यास आपण केव्हाही/कितीहीवेळा बदल करू शकतो.

६. आपली माहिती फायनल सबमिट केल्यानंतर गुगल ड्राईव्हवर मानकासंबंधित तयार केलेली फाईल अथवा फोल्डर यामध्ये कुठलाही बदल करू नये किंवा ती फाईल डिलीट करू नये. बदल अथवा डिलीट केल्यास SQAAF कार्यालय/बाह्य मुल्यांकन/त्रयस्थ संस्थेकडून केल्या जाणाऱ्या मुल्यांकनासाठी ती फाईल उपलब्ध होणार नाही त्यामुळे मुल्यांकनात अडथळा येवू शकतो.

७. आपल्या शाळेसाठी लागू नसणाऱ्या मानकासाठी वर्णन विधानाच्या खाली दर्शविण्यात आलेल्या "लागू नाही" या पर्यायावर क्लिक करावे. "लागू नाही" हा पर्याय निवडल्यास फाईलची लिंक पेस्ट करण्याची आवश्यकता नाही. सबमिट टॅब ओपन होईल.



८. आपल्या शाळेसाठी कोणती मानके लागू नाहीत ते व आवश्यक पुरावे येथे पहा : click here 


तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या शिक्षक बांधवांसोबत शेअर करा!

Home page  click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 


WhatsApp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा