शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन- बाल शिक्षण | Child Education Fellowship
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन: महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अनोखी संधी
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (SPIF) चे उद्दिष्ट
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून ही फेलोशिप प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना दिली जाते. मुख्य उद्दिष्ट:
-
शिक्षकांना सक्षम बनवणे
-
त्यांच्या संशोधनात्मक कामाला चालना देणे
-
शैक्षणिक आणि सामाजिक समस्यांवर अभ्यास करण्याची संधी देणे
फेलोशिप अंतर्गत २० प्राथमिक आणि १० माध्यमिक शिक्षकांसाठी संधी उपलब्ध आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि बालशिक्षण
NEP 2020 बालशिक्षणाला औपचारिक शिक्षणाचा भाग मानते. ३ ते ८ वर्षे वयोगटाला Foundational Stage म्हणतात. या धोरणात:
-
मूल्यशिक्षण, स्वयंअध्ययन, सहअध्ययन यांचा प्रभावी वापर
-
विविध विषयांचा परस्पर संबंध
-
कला, खेळ आणि बहुवर्ग अध्यापनाचा समावेश
-
वाचनाचा वेग व आकलन वाढवण्याचे उपक्रम
-
पालक आणि स्थानिक समाजाचा सहभाग
-
डिजिटल लर्निंगचा प्रभावी वापर
या धोरणाच्या आधारावर शिक्षकांना उपक्रम निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.
बालशिक्षण आणि त्याचे महत्त्व
बाल्यावस्था (जन्म ते ६ वर्षे)
-
मेंदूचा सुमारे ९०% विकास या वयात होतो
-
शैक्षणिक वातावरण, खेळ, अन्वेषण व कृती यांचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर खोल परिणाम होतो
भारतातील बालशिक्षणाचा प्रवास
-
गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक व अनुताई वाघ यांनी प्रारंभ
-
१९७५ मध्ये ICDS अंतर्गत अंगणवाड्यांद्वारे बालशिक्षण सुरु
-
‘आकार’ अभ्यासक्रमामुळे अंगणवाड्यांतील शिक्षणाची गुणवत्ता सुधारली
-
२०२० NEP ने बालशिक्षणाला औपचारिक शिक्षणाचा भाग मान्यता दिली
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप आणि बालशिक्षण
-
या वर्षी शालापूर्व स्तरावर काम करणाऱ्या १० शिक्षकांसाठी जागा राखीव
-
पात्र: अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, CDPO, अनुदानित शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि अशासकीय संस्थांतील बालशिक्षण कार्यकर्ते
-
उद्दिष्ट: बालशिक्षण क्षेत्रातील कृती संशोधनाला चालना देणे
कृतीसंशोधनाची आवश्यकता
-
शिक्षक प्रशिक्षण
-
धोरण: शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण
-
दरी: प्रत्यक्षात किती शिक्षकांना प्रशिक्षण मिळत आहे? गुणवत्ता कशी आहे?
-
-
खेळातून शिकणे (Play-based learning)
-
धोरण: अनुभवाधारित शिक्षण
-
दरी: किती शाळा या पद्धतींचा अवलंब करतात? आवश्यक साधने उपलब्ध आहेत का?
-
-
पालकांचा सहभाग
-
धोरण: पालकांचा सक्रिय सहभाग
-
दरी: किती पालक सहभागी होत आहेत? कोणत्या स्तरावर सहभाग आहे?
-
फेलोशिपसाठी विषय :
फेलोशिपचा प्रकल्प हायपर लोकल म्हणजे त्यांच्या स्थानिक कामात संशोधन करणारा असू शकेल.
वर्गांतर्गत कामाच्या पुढे जाऊन शिक्षण प्रशिक्षण, शासनाबरोबरील काम यावरही काम करता येईल.
वेबसाईटवर दिलेले विषय हे सूचक असतील. अर्जदारांनी त्यातील विषय निवडले तरी चालतील किंवा त्या व्यतिरिक्त स्वत:चे विषय निवडले तरी चालतील.
नमुना विषय :
शाळा
मुले
- कोणत्या वर्तन समस्या दिसतात? त्या कशा सोडवाव्यात?
- वेगळी मातृभाषा असणारी मुले वर्गात कशी जमवून घेतात?
वर्गातील प्रक्रिया
- बालकांच्या सर्वांगीण विकासाला वाव देणाऱ्या वर्गातील प्रक्रिया
- गणन पूरक संकल्पनांसाठी गणिती भाषेचा विकास
मुल्यमापन निरीक्षण
- निरीक्षण करून बालशाळेच्या मुलांचे मुल्यमापन करणे
- पोर्टफोलीओच्या माध्यमातून मूल्यमापन
साहित्य
- शैक्षणीक साहित्याची उपयुक्तता तपासणे
- मुक्तखेळाच्या माध्यमातून मुले काय आणि कसे शिकतात?
वातावरण
भौतिक वातावरण
- बालशाळेतील अध्ययन कोपऱ्यांचा वापर
- Displays चा वापर
सामाजिक वातावरण
- नियम आणि स्वयंशिस्त यांचा अभ्यास
- दिनचर्या
पालक/समाज
- पालक सभेच्या माध्यमातून पालकाचा सहभाग वाढवणे.
- परिसरातील उपलब्ध असणाऱ्या पदार्थांमधून पोषक आहार निर्मीती कशी करावी?
- बालवाडीतील मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या शिकवण्यांचा अभ्यास.
व्यवस्था
- Online प्रशिक्षण किती प्रभावी?
- शाळा भेटीदरम्यान बालशिक्षणाला कशी मदत करता येईल?
फेलोशिप तपशील :
घटक | तपशील |
---|---|
वयोमर्यादा | वय ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अंगणवाडी, बालवाडी सेविका, पर्यवेक्षिका, CDPO, बालशाळांमध्ये कार्यरत शिक्षक व मुख्याध्यापक, तसेच बालशिक्षणात काम करणाऱ्या अशासकीय संस्थांतील कार्यकर्ते |
फेलोशिप कालावधी | सप्टेंबर २०२५ ते मे २०२६ |
पात्रता (बालशिक्षण) | महाराष्ट्रभरात बालशिक्षणात काम करणारी लोक; विशेषतः Under privileged समुदायासाठी काम करणाऱ्या लोकांना प्राधान्य |
पात्र उमेदवार | - अंगणवाडी सेविका- अंगणवाडी मदतनीस- अंगणवाडी पर्यवेक्षिका- बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO)- बालशाळा शिक्षिका/शिक्षक- बालशाळा प्रमुख- अशासकिय संस्था कार्यकर्ता/कार्यकर्ती |
अयोग्य उमेदवार | खाजगी अंगणवाड्यांमध्ये काम करणारे |
फेलोशिपची संख्या | प्रती वर्षी १० |
अर्जदारांचे कार्यक्षेत्र | महाराष्ट्रातील अंगणवाडी, बालवाडी आणि बालशिक्षणात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था |
फेलोशिप रक्कम | रु. ६०,००० /- वार्षिक (रुपये साठ हजार फक्त)- रु. ४०,०००/-: उपक्रमांसाठी लागणारी साधने, संभाव्य प्रवास इ.- रु. २०,०००/-: कार्यशाळा आणि मेंटरिंगसाठी |
कृतीसंशोधन प्रकल्पासाठी फेलोशिप नियम व अटी
-
संस्थेची परवानगी:
-
ज्या संस्थेत तुम्ही काम करता त्या संस्थेकडून कृतीसंशोधन प्रकल्प करण्याची परवानगी असलेले पत्र सुरुवातीस सादर करणे आवश्यक आहे.
-
-
नवीन प्रकल्प:
-
आपण घेतलेला प्रकल्प पूर्वी केलेला नसावा.
-
पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension) करता येईल.
-
-
अद्वितीय प्रकल्प:
-
प्रकल्प इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा.
-
भविष्यातही तो इतरत्र सादर केला जाणार नाही.
-
-
कॉपी नको:
-
प्रकल्प दुसऱ्याची कॉपी नसावा.
-
जर दुसऱ्याची कल्पना वापरत असाल, तर पूर्वपरवानगी आवश्यक आहे.
-
-
प्रशिक्षणे आणि बैठक:
-
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या प्रशिक्षण किंवा बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
-
अपरिहार्य अडचण असल्यास पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
-
-
कालमर्यादा:
-
दिलेल्या वेळेत प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे.
-
उशीर झाल्यास फेलोशिपबाबत अंतिम निर्णय चव्हाण सेंटरकडे राहील.
-
-
निरीक्षण व सहकार्य:
-
प्रकल्प चालू असताना सेंटरचे प्रतिनिधी निरीक्षणासाठी येऊ शकतात.
-
प्रतिनिधींना आवश्यक सहकार्य करणे अनिवार्य आहे.
-
कामाबाबत चुकीच्या गोष्टी आढळल्यास फेलोशिप निर्णय सेंटरकडे राहील.
-
-
सादरीकरण:
-
प्रकल्पाचे सादरीकरण पोस्टरच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे.
-
-
अहवाल व वरिष्ठांचे पत्र:
-
प्रकल्पाचा अंतिम अहवाल सादर करताना वरिष्ठांचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
-
घटक | तपशील / पर्याय |
---|---|
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १५ ऑगस्ट २०२५ |
अर्ज करण्याचे संकेतस्थळ | https://apply.sharadpawarfellowship.com |
अर्ज करताना भरावयाची माहिती | नाव, मोबाईल नंबर, ई-मेल (असल्यास), जन्मतारीख, पत्ता, जिल्हा |
शैक्षणिक पात्रता | पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका, १२ वी, १० वी, माध्यमिकपूर्व (८वी/९वी पर्यंत), इतर |
पद / भूमिका | अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडी पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी (CDPO), बालशाळा शिक्षिका/शिक्षक, बालशाळा प्रमुख, अशासकिय संस्था कार्यकर्ता/कार्यकर्ती, इतर |
कामाचे ठिकाण | अंगणवाडी, अंगणवाडी बीट, एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प (ICDS), बालशाळा, अशासकिय संस्था (NGO), इतर |
फेलोशिप दरम्यान वेळ देण्याची तयारी | ८ तास प्रति आठवडा: हो / नाही |
कार्यशाळांमध्ये उपस्थित राहण्याची तयारी | हो / नाही (सप्टेंबर २५ ते एप्रिल २६, एकूण ४ कार्यशाळा, १० दिवस) |
अभ्यास विषय | फेलोशिपमध्ये करायच्या अभ्यासाचा विषय (७५–१०० शब्दात) |
विषयाचे क्षेत्र | मुलं, वर्गांतर्गत प्रक्रिया, मूल्यमापन, साहित्य, वातावरण, पालक/समाज, शिक्षण यंत्रणा, प्रशिक्षण, इतर |
विषय निवडण्याचे कारण | निवडलेला विषय का निवडला हे १००–१५० शब्दात लिहा |
निवड प्रक्रिया
तज्ज्ञ समितीकडून अर्जांची छाननी पूर्ण करण्यात येईल व पात्रतेचे निकष अधिक गुणवत्तेने पूर्ण करणाऱ्या मोजक्याच अर्जदारांची तज्ज्ञांतर्फे (आवश्यकतेनुसार शाळाभेटीसह) प्रत्यक्ष / दूरस्थ मुलाखतींसाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीतील गुणवत्तेच्या मूल्यमापनानुसार फेलोशिपसाठी वरील प्रमाणे १० जणांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या फेलोची, फेलोशिप स्वीकारण्याविषयीची लेखी अनुमती घेण्यात येईल. आवश्यकतेनुसार त्यांच्या वरिष्ठांची सहसंमती घेण्यात येईल.
फेलोशिप वेळापत्रक :
टप्पा / कार्यक्रम | तारीख / ठिकाण | टीप |
---|---|---|
अर्ज करण्याची अंतिम मुदत | १५ ऑगस्ट २०२५ | इच्छुक शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक |
अर्ज प्रक्रिया चालू | १६–३० ऑगस्ट २०२५ | अर्जाची छाननी आणि प्राथमिक तपासणी |
निवड झालेल्या शिक्षकांची यादी जाहीर करणे | ५ सप्टेंबर २०२५ / ८ सप्टेंबर २०२५ | अंतिम यादी सेंटरच्या संकेतस्थळावर |
निवड झालेल्या फेलोंची ऑनलाईन बैठक | तारखा नक्की करणे | सर्व निवड झालेल्या फेलोंसाठी बंधनकारक |
प्रथम कार्यशाळा | १९–२१ सप्टेंबर २०२५ (बारामती)१–२ नोव्हेंबर २०२५ (खंडाळा) | सहभागासाठी सर्व फेलो उपस्थित राहणे आवश्यक |
द्वितीय कार्यशाळा | १४ डिसेंबर २०२५ (मुंबई)७–८ फेब्रुवारी २०२६ (पुणे) | कार्यशाळेत प्रशिक्षण व मार्गदर्शन |
तृतीय कार्यशाळा / कामाचे प्रदर्शन | ४–६ एप्रिल २०२६ (नाशिक) + सिन्नर प्रकल्पाला भेट | प्रकल्पांचे अंतिम प्रदर्शन व अभिप्राय |
फेलोशिप ची सविस्तर माहिती : click here
सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. click here
अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा : click here
सर्व फेलोशिप ची माहिती व अर्जासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Home page : click here
Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
WhatsApp channel : click here
WhatsApp Group : Click here
Telegram channel : Click here
Download App for daily update: click here
Follow on google news : click here
WhatsApp channel : click here
टिप्पण्या