मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो. | तुम्हाला आमच्या वेबपेज वर तूमची पोस्ट / बातमी अथवा जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास आम्हाला संपर्क करा.

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन | Education Fellowship

शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन [ प्राथमिक आणि माध्यमिक ]

राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२०मध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रभावी अंमलबजावणी, त्यामधील साधने व तंत्रांचा परिणामकारक रीतीने उपयोग करावा, असे सुचविले आहे.मूल्यांकनाचे ध्येय सातत्यपूर्ण आणि आकारिक क्षमता आधारित असावे, असेही अपेक्षित आहे .चिकित्सक विचार,वैचारिक स्पष्टता,विश्लेषण क्षमता या उच्च बोधात्मक क्षमतांची तपासणी हे मूल्यांकनातून अपेक्षित आहे. ( संदर्भ :४. ३४ राष्ट्रीय शिक्षण धोरण -२०२० ) राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०मध्ये मूल्यांकन हे अध्ययन आणि विकास यांना गती देणारे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई ,शिक्षण विकास मंच यांच्यावतीने यावर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शालेय शिक्षणातील मूल्यांकन प्रक्रियेला केंद्रस्थानी मानून शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.या फेलोशिपसाठी आपण निवडलेल्या विषयाच्या माध्यमातून मूल्यांकन प्रक्रियेतील नवोपक्रम पूर्णत्वास जाईल व तो नवोपक्रम इतर शिक्षकांना मार्गदर्शक ठरेल.शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी शालेय स्तरावरील मूल्यांकन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मूल्यांकन विषयक प्रकल्पासाठी काम करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी ही एक पर्वणी असेल.यामधून क्षमताआधारित मूल्यांकन प्रक्रियेच्या विविध पैलूंवर अधिकाधिक परिणामकारक पद्धतीने काम करता येईल.

फेलोशिप तपशील :

माहिती तपशील
फेलोशिपसाठी वयोमर्यादा वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा कमी वय असणारे पूर्णवेळ शिक्षक
फेलोशिपचा कालावधी मे २०२६ ते एप्रिल/मे २०२७
फेलोशिपसाठी पात्रता - Themes मध्ये अंतर्भूत उद्दिष्टांशी सुसंगत, नियमित अध्यापन करत विद्यार्थ्यांच्या सहभागाने चालणारे शिक्षक.- वर्षभर विकसित होत जाणारे अभ्यासक्रमेतर व वेळापत्रकेतर उपक्रम राबवणारे/करू इच्छिणारे शिक्षक.- २०२६-२७ शैक्षणिक वर्षात बदली न होणारे शिक्षक.
फेलोशिपची संख्या २० प्राथमिक आणि १० माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक असे एकूण ३०
अर्जदारांचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र
फेलोशिपची रक्कम वार्षिक ₹६०,०००/- (रुपये साठ हजार). यातील ६०% रक्कम शिक्षकांना प्रत्यक्ष उपक्रमांसाठी (साधने, प्रवास इ.) देण्यात येईल. उर्वरित ४०% रक्कम कार्यशाळा व मार्गदर्शनासाठी खर्च केली जाईल.

फेलोशिप नियमावली :

१) आपण ज्या संस्थेत काम करीत आहात त्या संस्थेचे ‘नवोपक्रम’ करण्यासाठी तुम्हाला परवानगी दिल्याचे पत्र सुरुवातीसच द्यावे लागेल.
२) आपण जो नवोपक्रम हाती घेणार आहात तो यापूर्वी केलेला नसावा. मात्र पूर्वी केलेल्या प्रयोगाचे विस्तारीकरण (Extension ) करता येईल.
३) आपण करीत असलेला नवोपक्रम इतर कोणत्याही संस्थेत सादर केलेला नसावा तसेच पुढेही तो सादर करता येणार नाही.
४ ) आपण घेतलेला उपक्रम कोणाचीही कॉपी असू नये. जर दुसऱ्याची एखादी कल्पना घेवून काम करणार असाल तर तशी त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी घेतलेली असावी.
५ ) यशवंतराव चव्हाण सेंटर, ज्या ज्या वेळी यासंबंधीची प्रशिक्षणे किंवा बैठका घेईल त्यावेळी अशा बैठकास किंवा प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अपरिहार्य अडचण असेल तर तशी कल्पना यशवंतराव चव्हाण सेंटरला देवून परवानगी घ्यावी.
६ ) यशवंतराव चव्हाण सेंटरनी दिलेल्या वेळेतच आपला उपक्रम पूर्ण करणे अपेक्षित आहे. उपक्रमास उशीर झाला तर आपल्या फेलोशिपबाबतचा अंतिम निर्णय चव्हाण सेंटरला असेल.
७ ) आपला उपक्रम चालू असताना यशवंतराव चव्हाण सेंटरचे प्रतिनिधी कधीही तरीही पूर्व कल्पना देवून भेट देण्यास येतील. त्यावेळी त्यांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. जर या प्रतिनिधिंना कामाबाबत चुकीच्या गोष्टी ध्यानात आल्या तर फेलोशिप संबंधी यशवंतराव चव्हाण सेंटर निर्णय घेईल.
८) नवोपक्रम अंतिम अहवाल सादर करताना आपल्या संस्था प्रमुखाचे पत्र जोडणे आवश्यक आहे.

फेलोशिपसाठी अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • इच्छुक शिक्षकांनी १२ ऑक्टोबर २०२५ पूर्वी https://apply.sharadpawarfellowship.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

अर्जामध्ये समाविष्ट करावयाची माहिती

अर्जदारांनी फेलोशिपसाठी हाती घेत असलेल्या नवोपक्रमाविषयी सुमारे १००० शब्दांमध्ये (मराठी किंवा इंग्रजी भाषेत) लिहावे. त्यामध्ये खालील मुद्दे समाविष्ट करणे आवश्यक आहे:

  1. उपक्रमाचे शीर्षक

  2. उपक्रमाची गरज आणि महत्त्व

    • उपक्रम निवडण्याचे कारण

    • वेगळेपण आणि उपयुक्तता याबाबतचा तपशील

  3. उपक्रमाची उद्दिष्टे

    • उपक्रम का निवडला

    • त्याचा फायदा कोणाला आणि कशाप्रकारे होणार आहे

  4. उपक्रमाची वैशिष्ट्ये

    • अ. उपक्रमपूर्व स्थिती

    • आ. संबंधित व्यक्ती/तज्ज्ञ यांच्याशी चर्चा

    • इ. उपक्रमासाठी आवश्यक साधनांचा विचार

    • ई. उपक्रमातील कृतींचे टप्पे व क्रम (संभाव्य वेळापत्रकासह)

    • उ. अपेक्षित उपक्रमोत्तर कृती

    • ऊ. अंमलबजावणी केल्याचे पुरावे

  5. उपक्रमाची अपेक्षित फलनिष्पत्ती

महत्त्वाची अट

  • प्रस्तावित उपक्रम नवीन असावा.


निवड प्रक्रिया

  • तज्ज्ञ समितीकडून सर्व अर्जांची छाननी केली जाईल.

  • पात्रतेचे निकष आणि गुणवत्ता अधिक चांगल्या रीतीने पूर्ण करणाऱ्या शिक्षकांची निवड प्रत्यक्ष किंवा दूरस्थ मुलाखतीसाठी होईल. आवश्यक असल्यास शाळाभेटही घेतली जाईल.

  • मुलाखत शक्यतो अर्जासोबत दिलेल्या टिपणावर आधारित असेल.

  • मुलाखतीच्या मूल्यमापनानुसार ३० शिक्षक (२० प्राथमिक आणि १० माध्यमिक) अंतिम फेलोशिपसाठी निवडले जातील.

  • निवड झालेल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची लेखी संमती घेतली जाईल.

  • आवश्यक असल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची सहसंमतीही घेतली जाईल.


पूर्वतयारी (जानेवारी २०२६ ते मे २०२७)

  1. निवड झालेल्या फेलोजचे किमान ३ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर.

  2. उपक्रमांचे सादरीकरण आणि चर्चा करून अंतिम निश्चिती.

    • उपक्रमांचे नियोजन आणि मूल्यमापन

    • संसाधनांची जुळवाजुळव

    • सहभागी विद्यार्थ्यांची निवड

    • पालकांची अनुमती

    • मासिक व अंतिम प्रकल्प अहवालांची रूपरेषा

  3. गटानुसार मेंटर्स नेमणे.


फेलोशिपमधील उपक्रमांचा कालावधी

  • मे २०२६ ते मे २०२७ या कालावधीत ठरवलेले उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

  • फेलोजना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मासिक अहवाल सादर करावा लागेल.

  • एप्रिल २०२७ पर्यंत सर्व फेलोजनी सविस्तर अहवाल तयार करून हार्ड व सॉफ्ट कॉपी संयोजकांकडे पाठवावी.


फेलोशिप सांगता शिबीर

  • एप्रिल/मे २०२७ मध्ये २ दिवसांचे सांगता शिबीर आयोजित केले जाईल.

  • या शिबिरामध्ये:

    • सर्व फेलोजचे मार्गदर्शकांच्या उपस्थितीत सादरीकरण

    • तज्ज्ञांबरोबर चर्चा

    • शैक्षणिक परिवर्तनासाठी सातत्य राखण्याविषयी सूचना

  • शिबिरात प्रशस्तीपत्रांचे वितरण होईल.

  • फेलोजनी केलेले उपक्रम फेलोशिप पोर्टलवर प्रकाशित केले जातील.

  • पुढे पोर्टलला विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

  • या पोर्टलवर फेलोजचे ब्लॉग, शिक्षकांचे प्रतिसाद, सूचना आणि प्रश्नोत्तरे अशी सुविधा उपलब्ध केली जाईल.

  • पुढे हीच महासूची राज्यातील शेकडो शिक्षकांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल.


फेलोशिपच्या अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रक

क्रमांक कार्यक्रम दिनांक
1 फेलोशिपची घोषणा १५ ऑगस्ट २०२५
2 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत १५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
3 आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती १३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
4 अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा १ डिसेंबर २०२५
5 फेलोशिप प्रदान सोहळा कार्यक्रम

फेलोशिपचा कालखंड: मे २०२६ ते मे २०२७

क्रमांक कार्यक्रम दिनांक
1 फेलोज सोबत ऑनलाईन मिटींग १८ जानेवारी २०२६
2 प्रथम कार्यशाळा ८, ९, १० मे २०२६
3 प्रकल्पांना भेटी डिसेंबर २०२६ ते जानेवारी २०२७
4 द्वितीय कार्यशाळा २१, २२ नोव्हेंबर २०२६
5 तृतीय कार्यशाळा ६, ७ फेब्रुवारी २०२७
6 अंतिम कार्यशाळा आणि अहवाल सादरीकरण मे २०२७

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. click here

अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा : click here 

सर्व फेलोशिप ची माहिती व अर्जासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.




Home page  click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 


WhatsApp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा