मी योगेश जाधव (शिक्षक, लेखक, कवी) आपल्या DNYAN SAGAR या वेबपेजवर आपले हार्दिक स्वागत करतो. | तुम्हाला आमच्या वेबपेज वर तूमची पोस्ट / बातमी अथवा जाहिरात प्रसिद्ध करायची असल्यास आम्हाला संपर्क करा.

शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप | Literary Fellowship

 शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप

मराठी साहित्याचा वारसा जपण्यासाठी संघटनात्मक पातळीवर अधिक गांभीर्याने प्रयत्न आणि रचनात्मक प्रयोग करणे अत्यावश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती संख्या, अत्यंत स्पर्धात्मक वातावरण आणि विविध माध्यमांचा स्फोट या सर्वाच्या प्रभावामुळे तरुण पिढी मराठी साहित्यापासून आणि वाचन-लेखन-संशोधन संस्कृतीपासून दूर जात आहे. या पार्श्वभूमीवर मातृभाषा मराठीच्या सर्वंकष उन्नतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर हा एक चांगला मार्ग ठरू शकतो. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत काही नवोदित लेखक नवनवे विषय हाताळत असतात खरे;पण अशा लेखकांचे प्रमाण तितकेसे समाधानकारक म्हणता येणार नाही. त्यामुळेच तरुण पिढीत नवे लेखक निर्माण व्हावेत यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील उपजत लेखनप्रतिभा बहरावी यासाठी निश्चित कृतिकार्यक्रम देणे या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटरने 'शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप' सुरू केली आहे. 'ध्यास सर्वोत्तमचा, शोध युवा लेखकांचा' (परिपूर्णतेचे लक्ष्य, तरुण लेखकांच्या शोधात) हे या साहित्य फेलोशिप चे ब्रीदवाक्य आहे.

फेलोशिप चे उद्दिष्टे :

  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.

पाठ्यवृत्ती अंतर्गत तरतुदी :

  • प्रतिभावान तरुण लेखकांचा शोध घेऊन त्यांना साहित्य फेलोशिप द्वारे सर्जनशील लेखनासाठी व्यासपीठ प्रदान करणे.
  • लेखकांना पाठ्यवृत्तीच्या काळात नियोजनबद्ध मार्गदर्शन करणे व त्यांच्या लेखनाला योग्य दिशा देणे.
  • तज्ज्ञ समितीने मंजूर केलेले लेखकांचे लेखन पुस्तकरूपात प्रकाशित करण्यास संबंधित लेखकांना प्रोत्साहित करणे आणि मदत करणे.
पात्रता :
  1. दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका प्रकारात स्वतंत्र पुस्तक लिहिण्यास किंवा पुस्तक भाषांतरित करण्यास इच्छुक कोणीही मराठी भाषक तरुण लेखक-लेखिका अर्ज करू शकतात.
  2. वयोमर्यादा : १५ ऑगस्ट २०२५ रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा कमी.

फेलोशिप स्वरूप : 

अ) अर्ज करण्याची पद्धत :

फेलोशिपसाठी इच्छुक युवक-युवतींनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने विहीत केलेल्या गुगल फॉर्ममध्ये आपली अचूक माहिती भरावी. इच्छुकांनी तपशीलवार परिचय - नाव, पत्ता, संपर्क, शाळा, महाविद्यालय, नोकरी- व्यवसाय. आवडतेलेखक/आयुष्यावर प्रभाव टाकणारी किमान तीन पुस्तके अथवा लेखक याविषयी किमान २०० शब्दांत माहिती द्यावी. त्यात आणखी एक प्रश्न असेल ज्याचे सविस्तर उत्तर अपेक्षित असेल. प्रश्न : ‘शरदचंद्र पवार साहित्य शिष्यवृत्ती : ध्यास सर्वोत्तमाचा, शोध युवालेखकांचा’ या फेलोशिपमुळे तुम्ही सध्या लेखन करत असलेल्या कार्यात किंवा नियोजित लेखनकार्यात कशा प्रकारे साहाय्य होईल असे वाटते याचे सविस्तर उत्तर लिहा.

  • आपल्या नियोजित लेखनाचा मजकूर पीडीएफ स्वरूपात सोबत जोडावा. खालीलप्रकारे आपण मजकूर जोडू शकता :
  • कादंबरी असल्यास किमान २००० शब्दांचे एक प्रकरण; दीर्घ कथा असल्यास किमान एक प्रकरण. तसेच, कादंबरी अथवा दीर्घ कथेचा ५०० शब्दांत आराखडा/प्रारूप जोडावे.
  • नाटक असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि सोबत नाटकाचा विषय सुस्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • ललितेतर साहित्य (नॉन फिक्शन) असल्यास किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय-आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • अनुवादित साहित्य असल्यास, मूळ भाषेतील एक प्रकरण आणि त्याचा मराठीत केलेल्या अनुवादाचा मजकूर असे दोन्ही भाग जोडावेत. अनुवादित मजकूर हा किमान २००० शब्दांचा असावा. सोबत, मूळ पुस्तकाचे शीर्षक, लेखक, प्रकाशक, विषय-आशय यांची स्पष्ट माहिती देणारा आराखडा/प्रारूप किमान ५०० शब्दांत जोडावे.
  • विज्ञान साहित्य असल्यास, किमान २००० शब्दांचा मजकूर आणि विषय- आशय-तपशील स्पष्ट होईल अशा प्रकारचा किमान ५०० शब्दांचा आराखडा/प्रारूप जोडावे.
  • शरदचंद्र पवार साहित्य पाठ्यवृत्ती ही संशोधन प्रकल्पासाठी नसून साहित्य लेखनासाठी आहे. हे लक्षात घेऊन, ललितेतर साहित्य (nonfiction) या प्रकारातील लेखनासाठीचे विषय निश्चित करावेत.
  • इतरत्र पदवीसाठी वा अन्य कारणासाठी सादर केलेले साहित्य या पाठ्यवृत्तीसाठी स्वीकारले जाणार नाही. पाठ्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर तसे आढळल्यास त्या लेखकाला दिलेली पाठ्यवृत्ती कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. पाठ्यवृत्तीधारक लेखकाने निवडलेल्या विषयावर स्वतंत्रपणे नव्याने लेखन करणे आवश्यक आहे.

शरद पवार इन्स्पायर साहित्य फेलोशिप साठी इच्छुक लेखक खालीलपैकी कोणताही एक साहित्य प्रकार निवडू शकतात.

  1. कादंबरी किंवा दीर्घकथा.
  2. नाटक
  3. ललितेतर साहित्य (चरित्र, सामाजिक शास्त्रांशी संबंधित किंवा लोकसाहित्याशी संबंधित इत्यादी).
  4. कोणत्याही भारतीय किंवा विदेशी भाषेतून मराठीत अनुवाद (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
  5. विज्ञान साहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य).
  6. बालसाहित्य (ललित गद्य अथवा ललितेतर गद्य)
पाठ्यवृत्तीचे स्वरूप :
  1. निवड झालेल्या लेखकाला लेखनासाठी पाठ्यवृत्ती रु.५०,०००/-
  2. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत इतर खर्चासाठी सहाय्य रु. ५०,०००/-
  3. पाठ्यवृत्तीच्या कालावधीत होणाऱ्या अभिमुखता कार्यक्रम, संवाद-सत्रे यांसाठी प्रवास आणि निवास खर्च
  4. लेखकासाठी नेमलेल्या मार्गदर्शकांचे मानधन व प्रवासखर्च
  5. निवड समितीच्या मान्यतेनंतर पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अर्थसाहाय्य

ब) फेलोशिप कालावधी :

  • ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी : १५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
  • आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती : १३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा : १ डिसेंबर २०२५
  • फेलोशिप प्रदान सोहळा: १४ डिसेंबर २०२५

  • फेलोशिपचा कालावधी हा १४ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२६ असा एका वर्षाचा असेल.
  • अभिमुखता कार्यक्रम :निवड झालेल्या फेलोंच्या वेळेचे नियोजन बघून अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम) दिनांक १३ डिसेंबर किंवा १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडेल.
  • लेखनप्रगती मंथन बैठक पहिली : निवड झालेल्या उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी पहिली बैठक १० मार्च, २०२६ ते १२ मार्च, २०२६ या कालावधीत असेल.
  • लेखनप्रगती मंथन बैठक दुसरी : उमेदवारांच्या लेखनकार्याच्या प्रगतीचा आढावा घेणारी दुसरी बैठक १० जुलै, २०२६ ते १२ जुलै, २०२६ या कालावधीत असेल. अंतिम सुपुर्दता (सबमिशन) : बारा उमेदवारांनी वर्षभर केलेले लेखन १० नोव्हेंबर, २०२६ रोजी ते संस्थेकडे सुपुर्द करतील. त्याचे परीक्षण करून, दिनांक १४ डिसेंबर, २०२६ रोजी वर्षभरातील बारा उमेदवारांच्या लेखनाविषयीची माहिती सर्वांसमोर मांडण्यात येईल. तसेच, पुढील वर्षाच्या फेलोशिपसाठी (२०२६) अंतिम निवड झालेल्या बारा उमेदवारांच्या नावाची घोषणाही या दिवशी होईल.
  • प्रकाशन योजना : फेलोशिप अंतर्गत लेखकाने तयार केलेल्या लेखनाचा अंतिम मसुदा तज्ज्ञ निवड समितीने स्वीकृत केल्यानंतर तो पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सहकार्य करेल. यात (लेखकाच्या सहमतीने) प्रकाशन संस्थेची निवड आणि प्रकाशनासाठी/अनुवादाचे हक्काचे घेण्यासाठी रुपये २५ हजार आर्थिक सहकार्य यांचा समावेश असेल.

क) फेलोशिपसाठी निवड :

  • आलेल्या अर्जांचे आणि मजकुरांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास त्यांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः युवक  आणि युवती अशा एकूण १२  युवक-युवतींची
  • निवड तटस्थपणे करण्यात येईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हाच एकमेव निकष असेल.
ड) फेलोशिप स्वरूप :

फेलोशिप निवड समिती :

फेलोशिप निवड समितीमध्येमराठी साहित्यक्षेत्रात दीर्घअनुभव असलेल्या तज्ज्ञांचा समावेश असेल. निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. निवडलेल्या उमेदवाराच्या प्रगतीचा आढावा या समितीमार्फत वेळोवेळी घेण्यात येईल. सृजनाची प्रक्रिया ही बर्‍याचदा गुंतागुंतीची असल्याने, आवश्यकेनुसार मेंटॉरचा सल्ला विचारात घेऊन विशिष्ट परिस्थितीत लेखन प्रकल्पाची मुदत वाढवणे किंवा उमेदवाराची प्रगती समाधानकारक नसल्यास मुदत पूर्ण होण्यापूर्वीच फेलोशिप रद्द करणेयाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीला असतील.

  • अभिमुखता आणि लेखन आढावा सत्रांमध्ये समकालीन युवा लेखकांशी संवाद साधण्याची संधीही निवड झालेल्या उमेदवारांना लाभणार आहे.
  • या फेलोशिप योजनेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्राश्रीनितीन रिंढे हे मुख्य मार्गदर्शक व निवड समितीचे काम पाहतील. या फेलोशिप योजनेसाठी श्री. हेमंत टकले (सरचिटणीस, यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई) हे निमंत्रक असतील. यशवंतराव चव्हाण सेंटरचे रिसोर्स नॉलेज मॅनेजर डॉ. अनिल पाझारे, सेंटरचे मानद कार्यक्रम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ सहकार्य व समन्वय करतील.

प्रसिद्धी आणि प्रचार

ग्रामीण तसेच शहरी भागांतील युवा लेखकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचावी यासाठी संस्थेच्या वेबसाइट व्यतिरिक्त पुढील माध्यमांतून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे :

अ) वर्तमानपत्रे : सकाळ, पुढारी, लोकमत, लोकसत्ता, सामना, महाराष्ट्र टाइम्स, दिव्य मराठी, पुण्यनगरी, नवराष्ट्र या मुख्य वृत्तपत्रांसोबतच त्या-त्या भागांतील स्थानिक वृत्तपत्रांत या योजनेची माहिती प्रसिद्धीस देण्यात यावी.

ब) नियतकालिके/मासिके : साहित्यविषयक नियतकालिके/मासिके - मायमावशी, केल्याने भाषांतर, ललित, मुक्तशब्द, समाज प्रबोधन पत्रिका, चित्रलेखा, महानुभव, शब्दरुची, परिवर्तनाचा वाटसरू, मार्मिक, साधना, लोकप्रभा, राष्ट्रवादी मासिक, निवडक दिवाळी अंक इत्यादी.

क) वेब पोर्टल्स : विविध वेब पोर्टल्स, अक्षरनामा, थिंक महाराष्ट्र इत्यादी.

ड) सोशल मीडिया : फेसबुक आणि व्हॉट्स अपवरील साहित्यविषयक ग्रुप्स.

इ) साहित्यसंस्था : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखा, विदर्भ साहित्य संघ, बृहन्महाराष्ट्र मंडळ.

उ) वैयक्तिक स्तरावर प्रसार : मान्यवर लेखक, ब्लॉगर, संपादक यांना या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्याची विनंती करणे.

निवड प्रक्रिया :

विहित मुदतीत आलेल्या अर्जांचे आणि नमुना मजकुराचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत परीक्षण करून, आवश्यक वाटल्यास अर्जदार लेखकांच्या मुलाखती घेण्यात येतील आणि अंतिमतः एकूण १२ युवा लेखक-लेखिकांची निवड तटस्थपणे करण्यात येईल. स्त्री उमेदवारांना समान संधी दिली जाईल. निवड करताना गुणवत्ता, इच्छुकाने दाखवलेले गांभीर्य व शिस्त हेच निकष कटाक्षाने असतील.

क्रमांक कार्यक्रम दिनांक
1 फेलोशिप कालावधी १४ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२६
2 ऑनलाइन फॉर्म सबमिशन कालावधी १५ ऑगस्ट २०२५ ते १२ ऑक्टोबर २०२५
3 आलेल्या अर्जाची छाननी आणि निवडक उमेदवारांच्या ऑनलाइन मुलाखती १३ ऑक्टोबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५
4 अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची घोषणा १ डिसेंबर २०२५
5 फेलोशिप प्रदान सोहळा १४ डिसेंबर २०२५
6 अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्रॅम) १३ डिसेंबर किंवा १४ डिसेंबर २०२५
7 लेखनप्रगती मंथन बैठक पहिली १० मार्च २०२६ ते १२ मार्च २०२६
8 लेखनप्रगती मंथन बैठक दुसरी १० जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६
9 लेखनप्रगती मंथन बैठक तिसरी १० नोव्हेंबर २०२६
10 अंतिम सुपुर्दता (सबमिशन) आणि परीक्षण १४ डिसेंबर २०२६


सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. click here

अर्ज सादर करण्यासाठी येथे क्लिक करा : click here 

Home page  click here 

                 Follow me to get more such important information. And to stay connected with me, join the channel given below.

WhatsApp Group : Click here 

Telegram channel : Click here 

Download App  for daily update: click here 


Follow on google news : click here 


WhatsApp channel : click here

टिप्पण्या

Have any doubt ?
तुम्ही माझ्या DNYAN SAGAR -https://www.yogeshjadhave.com या वेबसाईट ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

Archive

संपर्क फॉर्म

पाठवा